केवलाद्वैत वेदान्त

‘वेदान्त म्हणजे वेदानाम् अन्त: |’- वेदांच्या शेवटी येणारे उपनिषद् ग्रंथ यांना वेदांत असे म्ह्टले जाते. ज्ञानाची परमसीमा उपनिषद्ग्रंथात दिसून येत असल्यानेदेखील त्यांना वेदांत अशी संज्ञा आहे. उपनिषदांच्या तत्त्वज्ञानावर आधारीत सर्वच ग्रंथाना नंतर वेदांत अशी संज्ञा दिली गेली. उपनिषदांचे तत्त्वज्ञान अत्यंत सारगर्भ आणि गूढ असल्याने त्यांची अर्थनिश्चिती करण्यासाठी बादरायणाने ५५५ सूत्रे लिहिली त्याला ’ब्रह्मसूत्रे’ असे संबोधले…